शिक्रापूर येथे साविञीबाई फुले पुण्यतिथी साजरी

329

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी पुणे विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे सदस्य राजाभाऊ भैलुमे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच परिसरातील अकरा विधवा महिला कि ज्यांनी खचुन न जाता संसार उभा केला अशा महीलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राजाभाऊ भैलुमे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहीती सांगितली. यावेळी आबासाहेब करंजे, सोमनाथ भुजबळ, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच रमेश थोरात, मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष रमेशराव भुजबळ, मंदिर ट्रस्ट चे सचिव पोपटराव गायकवाड,रोटरीचे सचिव प्रा.मनोहर परदेशी सर, डॉ मच्छिंद्र गायकवाड, उद्योजक रविंद्र भुजबळ, निलेश थोरात, मोहनराव विरोळे, ग्रामपंचायत सदस्य वंदना भुजबळ, सारिका सासवडे, अरुणदादा करंजे, पंढरीनाथ गायकवाड इ.मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिव पोपटराव गायकवाड यांनी केले, तर आभार अध्यक्ष रमेश राव भुजबळ यांनी मांडले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *