साबळेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल साबळे तर तर व्हाईस चेअरमनपदी जनार्दन साबळे

504
              शिरूर,पुणे पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या शिरूरच्या पश्चिमेकडील बेट भागातील  टाकळी हाजीच्या साबळेवाडी येथील बापुसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल चांदा साबळे यांची तर  व्हाईस चेअरमनपदी जनार्दन रभा साबळे यांची निवड झाली.निवडणूक अधिकारी म्हणून शंकर कुंभार यांनी काम पाहिले.
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे आणि टाकळी हाजीचे माजी आदर्श सरपंच दामुअण्णा घोडे यांच्या दोन पॅनलच्या चुरशीने झालेल्या लढतीत अध्यक्ष पदासाठी विठ्ठल चांदा साबळे आणि बबन बाबुराव साबळे  यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी संभाजी हारकु घोडे आणि जनार्दन रभा साबळे यांनी अर्ज दाखल केले होते.निवड झालेल्या संचालकांपैकी एक संचालक गैरहजर राहिल्याने दोन्ही पॅनलच्या चारही उमेदवारांना समान मते मिळाली. यामुळे चिठ्ठी पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे विठ्ठल चांदा साबळे यांची अध्यक्षपदी तर माजी सरपंच दामुअण्णा घोडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चे जनार्दन रभा साबळे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली.
एकंदरीत टाकळी हाजी गावातील सध्याची बदलती राजकीय समीकरणे पाहता दोन्ही गटांना पदे मिळाल्याने सर्वसामान्य जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *