मानव एकता दिवसानिमित्त संत निरंकारी भक्तांकडून पेरणे फाटा येथे रक्तदान शिबीर संपन्न

328

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असीम कृपाशिर्वादाने मानव एकता दिवस निमित्त रविवारी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. ताराचंद कारामचंदानी (झोनल इन्चार्ज, पुणे झोन ३४) यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे उदघाटन आशोक कोऱ्हाळे जी ज्ञानप्रचारक पुणे व गजानन पवार साहेब अधिकारी निरिक्षक लोणीकंद पोलिस स्टेशन यांच्या शुभहस्ते झाले. “माणसाचे रक्त नाल्यामध्ये न वाहता ते माणसाच्या नसांमध्ये प्रवाहित वाहावे” असा संदेश “संत निरंकारी मिशन चे चौथे सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी महाराज” यांनी दिला होता, यातून प्रेरणा घेत पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन पेरणे-फाटा येथे ३१० तसेच संत निरंकारी सत्संग भवन काळेवाडी पिंपरी येथे ८१५ असे एकूण ११२५ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले. या वेळेस अंगद जाधव (सेक्टर संयोजक, भोसरी), दत्तात्रय सातव (सेक्टर संयोजक, आव्हाळवाडी), संजय भिलारे (मुखी, पेरणे फाटा सत्संग), विक्रम पानसरे ( सेवादल संचालक युनिट न. १०३८) तसेच अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवली तसेच रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील संयोजक,मुखी,संत निरंकारी मिशन च्या स्वयंसेवकांनी  मोलाचे योगदान दिले.“मानवतेच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित व्हावे, या भावनेने प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे”, असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी मानव एकता दिवसाच्या कार्यक्रमादिवशी काढले. युगप्रवर्तक सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी आध्यात्मिक जागृती द्वारा विश्वबंधुत्व तसेच एकत्व चा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचवला. त्याचसोबत सेवेची मूर्ती चाचा प्रताप सिंह जी आणि अन्य भक्तांचे स्मरण करण्यात आले. संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर आयोजित केलेल्या २७२ रक्तदान शिबिरांमध्ये ५०,००० हुन अधिक युनिट रक्त संकलन झाल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *