मशिदीवरील बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे त्वरित काढा – तालुका मनसेची शिरूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी 

763
        शिरूर,पुणे – (सा.समाजशील वृत्तसेवा) –  शिरूर तालुक्यातील व शहरातील मशिदीवरील बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे त्वरित काढून टाका अशी मागणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
        मनसेने शिरूर पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शिरूर तालुका व शहरातील अनेक भागामध्ये मशिदीवर बेकायदेशीर व अनधिकृतपणे भोंगे लावण्यात आलेले आहेत. सदर भोंगे काढून टाकणेबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने आदेश देखील पारित केलेले आहेत.
        दिनांक ३ मे पर्यंत सदर मशिदीवर असलेले बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे काढून मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करून संवैधानिक विचार सर्व नागरिकांच्या मनात रुजवून, कायदेशीर बाबी पूर्ण करून कायद्याचे राज्य अबाधित ठेवावे व जातीय सलोखा राखण्यास मदत करावी असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर तालुका व शहर वतीने कायदयाची अंमलबजावणी करणेसाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ३ तारखेपर्यंत सदर बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे न उतरविलेस “हनुमान चालीसा लावून त्याचे वाचन केले जाईल”, याची नोंद घ्यावी.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ही तालुका मनसेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे मा तालुकाध्यक्ष कैलास नरके,महिला तालुकाध्यक्ष डॉ. वैशाली साखरे,शिरूर महिला शहराध्यक्ष शारदा भुजबळ,ऍड.स्वप्नील माळवे तालुकाध्यक्ष- मनविसे,सुदाम चव्हाण-तालुकाध्यक्ष-रस्ते आस्थापना,संजोग चव्हाण-शहराध्यक्ष-रस्ते आस्थापना,बंडू दुधाने-जनहित-उपाध्यक्ष परेश सुपते,पप्पू वरपे,मंगेश कांबळे,चंद्रकांत जाधव
श्रीकांत नरके,भाऊ केदार यावेळी उपस्थित होते.
        ” ज्यांनी भोंग्यांची परवानगी घेतली आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे,निर्देशाचे पालन करावे.परवानगी नसलेल्यांनी परवानगी काढून घ्यावी. ३ तारखेनंतर परवानगी न घेता भोंगे चालूच असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई,केसेस करण्याचे काम चालू होईल.”
– सुरेशकुमार राऊत – पोलीस निरीक्षक,शिरूर   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *