नीरा नरसिहपूर,पुणे : हाजी फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गा परिसरात पेव्हिंग ब्लॉक्ससाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर, दर्गापरिसर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये देणार – प्रविणभैय्या माने

507
लुमेवाडी ता इंदापूर येथील हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये फुलांची चादर चढवताना प्रविण माने व मान्यवर         
        नीरा नरसिहपूर,पुणे : इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील  हाजी फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गा परिसरात पेव्हिंग ब्लॉक्ससाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दर्गापरिसर सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये देणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैय्या माने यांनी दर्ग्याला भेटीप्रसंगी जाहीर केले.     लुमेवाडी येथील हाजी फतेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या मजारवर चादर चढविताना प्रविणभैय्या माने बोलत होते. यावेळी मयूर घोगरे, सुनील जगताप, कमाल जमादार, हाजी उस्मान शेख, नूरमहंमद शेख, आबा रूपनवर, सद्दाम जमादार, राजू शेख, स्थापत्य सहाय्यक वसंत शेंडे, बांधकाम अभियंता रोशन तुमसारे आदि मान्यवर उपस्थित होते.
        प्रविण माने पुढे म्हणाले, मागील वर्षी उरूसाच्या निमित्ताने बाबांच्या दर्ग्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते ते आता मार्गी लागले आहे. सध्याला दर्गा परिसरात पेव्हिंग ब्लॉक्ससाठी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होईल. दर्गापरिसर सुशोभिकरण कामासाठी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील असे शेवटी प्रविण माने यांनी सांगितलेे. देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जोधपूरी बाबा  दर्गाहला येणा-या  भाविकांच्या सुख सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून लवकरच येथे एसटी बस सुरू करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही माने यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले.
– प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *