शिक्रापूर, पुणे : पुणे -नगर हायवे वर शिक्रापूर येथे अपघात ; १ ठार , १ जखमी

1413

शिक्रापूर, पुणे : पुणे -नगर राज्य मार्गावर शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे आज सकाळी (५ डिसेबर )  रोजी  झालेल्या अपघातमध्ये एकजण जागीच ठार झाला असून, गाडीवर पाठिमागे बसलेली महिला जखमी झाली आहे. दसरथ  बाबुराव धायरकर (वय ५९) हे जागीच ठार झाले असून, लक्ष्मीबाई बबन गायकवाड या जखमी झाल्या आहेत. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दसरथ बाबुराव धायरकर हे आपल्या दुचाकीवरून  (एम एच १२ ,ऐ  वाय ९८७२)  घराकडे येत असताना पाठिमागुन येणाऱ्या चारचाकी कार ( एम .एच.१२ एन यु.१९९२) या गाडीने वळत असताना जोरदार धडक दिली . यामध्ये धायरकर जागीच ठार झाले तर लक्ष्मी बाई गायकवाड या जखमी झाल्या याबाबत निलेश सुरेश धायरकर (वय २८) यानी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून, कार चालक सुनिल बाबुराव बाजारे (रा बुर्केगाव ) असल्याचे समजते. या  भागात आज पर्यंत  मोठ्या प्रमाणात अपघात झाले असुन या चौकामध्ये गतीरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत लांडे यांनी केली . पूढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

– प्रतिनिधी ,राजाराम गायकवाड (समाजशील न्युज नेटवर्क, शिक्रापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *