टाकळी हाजीच्या साबळेवाडीतील अतिक्रमण हटवा – मागणीसाठी संतोष साबळेंचे चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु 

752
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या साबळेवाडी  येथील गावठाण हद्दीत सुमारे सहा एकर जागेत गेली अनेक वर्षे अतिक्रमण झालेले असुन ही अतिक्रमणे काढण्यात यावीत या मागणीसाठी  स्थानिक ग्रामस्थ संतोष मोहन साबळे यांनी सोमवार दि. ३ एप्रिल पासुन टाकळी हाजी ता .शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.आज दि. ०६ ला त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून जो पर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा संतोष साबळे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिला आहे.

संतोष साबळे यांनी शिरूर तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत टाकळी हाजी यांना याबाबत  वेळोवेळी निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी गेल्या तीन वर्षापासुन करीत ते सातत्याने करीत आहे. त्यांच्या मागणीनुसार शिरूर भुमी अभिलेख कार्यालयाने या क्षेत्राची मोजणी केली आहे . त्यानुसार अ साबळेवाडी येथील गावठाण हददीत मोठ्या प्रमानात अतिक्रमण झाले आहे .हे सिद्ध झाले असुन, हे अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे. 

         गावात अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमणे करीत जागा लाटल्या असुन, गावा बाहेरील लोकानीही येऊन अतिक्रमणे केलेले आहे.अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा पांठीबा मिळत आहे. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,माजी सरपंच दामु आण्णाघोडे, पंचायत  समिती सदस्या व विद्यमान सरपंच अरुणाताई घोडे संचालक सावित्राशेठ थोरात, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, भाऊसाहेब महाराज चोरे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संभाजी साबळे, बाबाजी रासकर, दत्तात्रय मुसळे, सोनभाऊ मुसळे, भिम आर्मी, गुरुकुल शिक्षक संघ, वारकरी मंडळ गावातील अनेक सामाजिक संस्था तसेच तरुण वर्गाने या उपोषणाला पांठीबा दिला आहे.
    – राजेंद्र खराडे – ग्रामविकास अधिकारी,टाकळी हाजी 
– साबळेवाडी येथील गावठाण हद्दीतील अतिक्रमण क्षेत्राची मोजणी झालेली असून सदर क्षेत्राचा ग्रामपंचायत ला ताबा घेता यावा म्हणून पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे.पोलीस संरक्षण मिळताच साबळेवाडीतील या गावठाण अतिक्रमण क्षेत्राचा ताबा घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *