मोफत सर्वरोग निदान शिबीरात १३५ जणांनी घेतला लाभ

359
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर (मलठण फाटा ) येथील मॅक्सनोव्हा हॉस्पिटलमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीर सपन्न झाले. सोमवारी सकाळी नऊ वाजता या शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबीराचे उदघाटन वार्डाच्या सदस्या पुजा भुजबळ यांच्या हस्ते झाले. शिक्रापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी या संधीचा फायदा घेतला. यावेळी रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले तसेच पुढील उपचारासाठी फी मध्ये सवलत देण्यात येईल असे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. यापुढेही अशा प्रकारे समाजाची सेवा करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन केले जाईल असे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रतिभा सोमनाथ ताठे व डॉक्टर फातेमा आसिफ शेख यांनी बोलताना सांगितले. द्योजक सोमनाथ ताठे व डॉ.आसिफशेख तसेच हॉस्पिटल स्टाफ, सतिश गायकवाड, रोशनी पवार, जयश्री वाळुंज, सुषमा खेडकर, राजेश्री भुजबळ यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी माजी उपसरपंच रमेश थोरात शुभाष खैरे, विशाल खरपुडे, मैञी ग्रुपचे नवनाथ गायकवाड, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष विशाल गायकवाड, उद्योजक गोरख बाप्पू ताठे उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *