मुरबाड पोलिसांची गावठी हातभट्टी दारू विरुध्द समूळ नष्ट अभियान ; तालुक्यातील हातभट्टी शोधून केल्या नष्ट

322

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड पोलिसांनी गेल्या 8 ते 9 महिन्या पासून मुरबाड शहरात रिंग राउंड गस्त अमलात आणून अनेक चोरीचे, घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणले. कल्याण तालुका, मुरबाड, टोकावडे, किन्हवली पो.स्टे. हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणून आरोपींना कोर्टात हजर करून मा.न्यायालयाच्या सुनावणीत आरोपींना शिक्षाही झाली. गावपातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसुरक्षा रक्षक दल निर्माण करून रात्री गस्त चालू केली. या सर्वांचा परिणाम प्रभावी गुन्हे प्रतिबंध होऊन रात्रीचे गुन्हे चोरी, घरफ़ोडी, मारामारी, महिलांची छेडकाणी असे गुन्हे जवळपास बंदच झाले. मुरबाड पोलिसांच्या या उत्तम कामगिरीमुळे मुरबाड नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते पोलिसांचे कौतुक करत आहे व त्यांना समर्थन देत आहेत. आता मुरबाड पो.स्टे. कडून दारूभट्टी भस्म अभियान राबविण्यात येत आहे. त्यात नारिवली उचले जंगल, कोरावळे, खाटेघर परिसरातील बेकायदेशीर दारू हातभट्टी विरोधात कायदेशीर कारवाई करून हातभट्ट्या नष्ठ करून गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दारू भट्टी चालवणाऱ्यामध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. मुरबाड पो.स्टे.कडून करण्यात येणाऱ्या हातभट्टी दारू विरुद्धच्या कारवाईचे महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे व पोलिसांना दारूभट्टी व दारू विक्रेत्यांची माहिती पूर्वीत असल्यामुळे मुळे पोलिसांच्या ह्या कारवाईला लोकसहभाग प्राप्त झाले आहे. परिणामी दारूभट्टी समूळ नष्ठ अभियानास मोठे यश मिळत आहे व मुरबाड पोलिसांचे कौतुक होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *