कृषी विज्ञान केंद्र नागांव येथे “गरीब कल्याण संमेलन” संपन्न ; पंतप्रधानांनी साधला ऑनलाईन संपर्क

315
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय निर्गमित, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर संलग्न कृषी विज्ञान केंद्र नागांव, तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांच्यावतीने डॉ. सुरेश जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली 31 मे 2022 रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारामध्ये ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन सर्व जिल्ह्यांमध्ये पसरलेले आजवरचे सर्वात मोठे एक देशव्यापी संवादांपैकी एक आहे, जिथे माननीय पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी घरे, पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता, अन्न, आरोग्य, कृषि व पशुसंवर्धनाच्या आणि विस्तृत योजना/कार्यक्रमांच्या प्रभावाबद्दल संवाद साधला. या कार्यक्रमाला 1500 हून अधिक ठिकाणातून ऑनलाइन  प्रक्षेपण आणि संवाद चालू होता. जगभरातील सर्वात मोठा ऑनलाइन परिसंवादाचा कार्यक्रम म्हणून डंका झाला. या कार्यक्रमामध्ये हिमाचल प्रदेश, बिहार,त्रिपुरा, कर्नाटका व गुजरात इ. ठिकाणावरून विविध योजनांचे लाभार्थ्यांनी थेट पंतप्रधानासोबत वार्तालाभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन कॉन्फेरेंसिंग च्या माध्यमातून संवाद साधताना प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, पोषण अभियान, प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना, इ. अश्या 12 योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करताना मा.ना.कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज) यांनी सदर योजनांच्या लाभ घेण्याचे शेतकरी व सर्वसामन्य घटकांना आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात ह्या मोहीम राबवल्या जात असून त्यात एक कोटीहून अधिक शेतकरी सहभागी होत आहेत. या मोहिमेत ठाणे जिल्यातील शेतकऱ्यांनीही सहभाग घेण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. तसेच रामभाई मोकारीया (राज्यसभा सदस्य, गुजरात), यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यामातून दुप्पट उत्पन्नाचे धडे घेण्यासाठी सूचित केले, किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा) यांनी कृषि विज्ञान स्थापनेची पार्श्वभूमी सांगून, कृषि, पशु-पक्षी, मत्स्य आणि विपण संदर्भात विविध प्रशिक्षणे व जनजागृती करून घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केले आणि केव्हीके च्या तज्ञांना शेतकऱ्यांची बियाणे फसवेगिरी पासून दूर करणेसाठी विविध सुधारित जाती व कंपन्या सूचित करण्यास लावल्या. तसेच या संमेलनासाठी 500  हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी  विविध ठिकाणाहून आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, ई. मान्यवर उपस्थित होते. अशी अपेक्षा आहे की या संवादामुळे या योजनांचा लोककेंद्रित दृष्टीकोनच अधोरेखित होईल ज्यामुळे नागरिकांचे जीवन सुसह्य होईल परंतु लोकांच्या आकांक्षांवर सरकारचे प्रबोधन होईल आणि देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. संमेलनाच्या अंतिम टप्प्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रा नागाव यांच्याकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पूर्वक तीन कृषी विषयक उपयुक्त घटक असलेली बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री. विशाल यादव (उद्यानविद्या), डॉ. मयुर नवले (पिक संरक्षण), अस्मिता म्हात्रे (गृह विज्ञान) यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बद्दल व विविध तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या संमेलनाचे सूत्रसंचालन विशाल यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मयूर नवले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता केव्हीकेचे विषय विशेषज्ञ प्रणाली ठाकरे व इतर कर्मचारी रिषभ पाटील (प्रक्षेत्र व्यवस्थापक), श्रुती गायकवाड (कार्यक्रम सहाय्यक-संगणक), रुचिता ठाकरे (कार्यक्रम सहाय्यक-प्रयोगशाळा) आणि कौशल्य हीन सहाय्यक कल्पेश दळवी व सुजित गुंजाळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *