कवठे- सविंदणे रस्त्यावर इचकेवाडी जवळ अपघात

1258

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : शिरूर तालुक्यातील कवठे- सविंदणे रस्त्यावरील इचकेवाडी जवळ चारचाकीचा अपघात झाला. यामध्ये एक स्त्री गंभीर जखमी झाली आहे. दि.३१ मे रोजी उशिरा रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. सदर प्रवासी हे कारेगावला वाढदिवसानिमित्त गेले होते. तेथून घरी येत असताना ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपामुळे व रात्रीचा वेळ असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि चारचाकी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चारीमध्ये जाऊन कोसळली. यामध्ये नम्रता शहाजी पवार या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर विघ्नहर्ता हॉस्पिटल शिरूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. इतर प्रवासी सुखरूप असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कवठे- सविंदणे रस्त्याच्या वळणावरील वाढलेल्या झाडे, झुडपामुळे रस्ता झाकला गेल्याने येणारी-जाणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरी हा रस्ता व्यवस्थितपणे खुला व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *