कवठे येमाईत विविध विकासकामांचा प्रारंभ – १५ व्या वित्त आयोग निधीतून २० लाख रुपयांच्या वर विकासात्मक कामे होणार -ग्रा.वि.अ. चेतन वाव्हळ यांची माहिती 

334
          शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावरील मोठे व महत्वाचे गाव असलेल्या ग्रामपंचायत कवठे यमाई येथे आज मंगळवारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोग निधीतून २० लाख रुपयांच्या वर विकासात्मक कामे सुरु करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी सा.समाजशील न्यूज शी बोलताना दिली. या कामांचा प्रारंभ शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून येथील जामा मस्जिद,ग्रामपंचायत कार्यालया समोर पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
           या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ,सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.सन २०२०/२१ व २०२१/२२ मधील १५ व्या वित्त आयोग निधीतुन सुतार आळी गटर लाईन,ढोर गल्ली शौचालय,३)बाजार तळ सार्वजनिक शौचालय युनिट,श्री यमाई माता क्रीडा संकुल शौचालय युनिट,गावठाण ग्रामपंचायत,मस्जिद परिसर सुधारणा,गावठाण रस्ता पेव्हिंग ब्लॉक, गावठाण नवीन पत्रा शेड  स्मशानभूमी,बाराभाऊ सभागृह दुरुस्ती,गटर लाईन बाफना सोसायटी मागासवर्गीय शौचालय दुरुस्ती,हरिजन वस्ती समाज मंदिर दुरुस्ती मातंग वस्ती समाज मंदिर दुरुस्ती इत्यादी कामे होणार आहेत. हि कामे दर्जेदार व टिकावू व्हावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *