कावळपिंप्री येथील रोहिदास पाबळे खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार दिलीप आटोळे अखेर जेरबंद

557
            पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) –  दि ९/३/२०२२ रोजी कावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व त्याचे सोबत इतर साथीदारांनी मिळून रोहिदास पाबळे याचेवर रात्रीचे वेळी अचानक हल्ला चढवत गावठी पिस्तुलातून गोळीबार करत व धारदार शस्त्रांनी वार करून रोहिदास पाबळे याचा खून केला होता. सदर गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी व एक विधी संघर्ष बालक यास यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून ताब्यात घेण्यात आलेले होते.  सदरच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी दिलीप रामा आटोळे वय ४४ रा. कावळपिंप्री ता जुन्नर जि पुणे मुळ रा मोहाडी धुळे हा गुन्हा घडल्यापासून सतत आपला ठावठिकाणा बदलून धुळे ,जालना,दिल्ली बदलापूर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता.आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलीप आटोळे हा त्याचे पत्नीसह करंजाडे पनवेल येथे असले बाबत गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दिलीप आटोळे याचा शोध घेतला असता अखेरीस करंजाडे,पनवेल या ठिकाणी  तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील तपास कामी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपीवर यापूर्वी देखील खुन,खंडणी ,मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाँ अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण ,अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जावळे यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पो.स ई गणेश जगदाळे,सहायक फौजदार तुषार पंदारे,पो.हवालदार जनार्दन शेळके,पो.हवा.राजू मोमीन,पो.ना मंगेश थिगळे,पो.काँ दगडू विरकर यांनी केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *