युवा कौशल्य विकास समाज सेवा संस्थेच्या अंतर्गत महिलांना टेलरिंग प्रमाणपत्र वाटप

364

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : प्रधानमंञी कौशल्य योजना अंतर्गत टेलरिंग कोर्स पूर्ण केलेल्या सुमारे 90 महिलांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते प्रमाणपञे देऊन गौरविण्यात आले. स्वयं रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या युवा कौशल्य विकास समाजसेवा संस्थेअंतर्गत मुली, महिलांसाठी विविध प्रकारचे कोर्सेस दिले जातात. यामध्ये पॅरा मेडिकल डिप्लोमा, अॕटोमोबाईल, रिटेल सेल्स कोर्स व टेलरिंग चे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतून पॅरा मेडिकल डिप्लोमा केलेल्या मुलींना नोकरीची हमी दिली जात असून, कल्याण येथील खाजगी नामांकित हॉस्पिटलमध्ये या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या काही मुलींना नोकरी सुद्धा मिळाली आहे. आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. मागील काही महिन्यात ग्रामिण भागातील 90 मुली व महिलांना टेलरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांच्या प्रमाणपञाचे वितरण आज कुणबी भवन मुरबाड येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून या महिलांना शिलाई मशिनसाठी प्रयत्न करणार असल्याचे सुभाष पवार यांनी आश्वासन देऊन या संस्थेचे कौतुक केले. तळागाळातील महिलांना रोजगार व स्वावलंबी बनण्याचे महत्वाचे काम संस्था करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोहर ईसामे, सचिव दशरथ भगत, पंचायत समितीचे पेसा समन्वयक प्रल्हाद रोकडे, जयराम पगार, संस्थेच्या अध्यक्षा दया खाटेघरे, सल्लागार महेंन्द्र मधुकर राणे, उपाध्यक्ष संतोष खाटेघरे, सचिव वैशाली खाटेघरे, प्रशिक्षिका रंजना जयदिप अढाईंगे, संजय बोरगे, दिलीप पवार यांच्यासह प्रशिक्षण घेतलेल्या युवती व महिला उपस्थित होत्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *