मुरबाड,ठाणे : मुरबाड मधील अनधिकृत बांधकाम मुख्याधिकारी पंकज भुसे याना भोवले; भुसे यांचेवर निलंबनाची कारवाई

1437
        मुरबाड,ठाणे : नगरपंचायतीचे पहिले मुख्याधिकारी पंकज भुसे यांना मुरबाड शहरातील अनधिकृत बांधकाम चांगलेच भोवले असुन अप्पर सचिव सचिन सहस्रबुध्दे यांनी  भुसे यांच्या निंलबंनाचा आदेश जारी केल्याने मुरबाड मध्ये त्यांच्या निलंबन चर्चेला उधाण आले आहे.
       मुरबाड शहराचा कायापालट करताना शहरातील तीन हात नाका ते मुख्य बाजारपेठ यातील अनधिकृत व्यापारी गाळ्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने प्रभारी संचालनाने सादर केलेल्या अहवाला नुसार चौकशी समितीच्या निष्कर्ष विचारात घेवुन पदावर कार्यरत असताना गंभिर न राहता अनियमित प्रकरणी त्याना निंलबित करण्यात आले, नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 चा 4 मधिल तरतुदी नुसार निलंबन करण्यात आल्याचे निंलबन पत्रात म्हटले आहे. मात्र या निलंबनामुळे अनधिकृत व्यापारी गाळ्याच्या बांधकामाला पाठींबा देणाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. शहराचा कुठलाही विकास अराखडा मंजुर नसल्याने या बांधकामा विरोधात अनेक आंदोलन उपोषण झाले.  मात्र याबाबत कधीही सामोरे जाताना सारासार दुर्लक्ष करणाऱ्या भुसेंना अखेर निलंबन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *