इम्पॅक्ट : सविंदणे-कवठे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे हटविली

375

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : सविंदणे – कवठे रस्त्यावर दुतर्फा झाडे – झुडपे वाढल्याने अपघाताची शक्यता, तरी हा रस्ता खुला व्हावा अशा आशयाची बातमी सा.समाजशील ने १ जून रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही झाडे – झुडपे हटविण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी सर्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके उपस्थित होते. हे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे व सा.समाजशीलचे अभिनंदन केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *