चांगल्या अधिकारी वर्गाची परांपरा असलेला शिरुर तालुका हा रत्नांची खाण आहे -उपजिल्हाधिकारी रामदास जगताप

582

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : राऊतवाडी शिक्रापूर येथे महसुल वैद्यकीय क्षेञात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नायब तहसिलदार म्हणून अक्षय म्हेञे, एम बी बी एस  ऋतिक गायकवाड, बी ए एम एस हर्षदा गायकवाड यांचा सत्कार राऊतवाडी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी (PMRD) रामदास जगताप, संस्कृत भारतीचे नितीन वारे, राष्ट्रीय स्वयंसेवकचे संभाजी गवारे, पुणे महानगरचे कार्यवाह महेश कर्पे, नाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, माजी उपसरपंच रमेश थोरात, सोसायटीचे चेअरमन दता मांढरे, त्रिनयन कळमकर, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, मोहन विरोळे, संभाजी भुजबळ, पंढानाना राऊत, भरत म्हेञे, दिलीप भुजबळ, माजी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गायकवाड, नाथ म्हस्कोबाचे अनिल भुजबळ, उद्योजक रविद्र भुजबळ, सुरेश काळोखे तसेच मलठण फाटा शिक्रापुर परिसरातील सर्व नागरिक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला हजर होते. यावेळी अक्षय म्हेञे. ऋतिक गायकवाड, हर्षदा गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करुन या माध्यमातुन जास्तीतजास्त समाजसेवेची कामे करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. शिरुर तालुक्यात दर्जेदार आधिकारी असुन त्या ते विविध क्षेञात चांगले काम करत आहे. अशीच परांपरा येथुन पुढेहि सुरु ठेवावी व लोकांच्या समस्या सोडाव्यात अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमात यशस्वी मुलांचे आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राऊतवाडी ग्रामस्थ तसेच म्हेञे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार जिजामाता हाँस्पिटलचे डॉ.मच्छींद्र गायकवाड यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता पंसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे संचालक सुनिल भुमकर, डॉ.प्रीतम दरवडे गायकवाड यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *