मुरबाड तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर

324

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजणार

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात होवू घातलेल्या 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे आरक्षण सोडत तहसीलदार संदिप आवारी यांनी २४ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहिर केली. आरक्षण जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील भोरांडे , मोरोशी, फांगुलगव्हान,खुटल(बा.) वाल्हिवरे, मेर्दी, करचोंडे, शिरोशी, बुरसुंगे, वेळुक, शेलगाव, उमरोली बु,, किसळ, इंदे, सायले, दहिगाव- चाफे, प-हे, धसई, उमरोली खु, महाज, मिल्हे, खेवारे, कळंभाड (भो,) एकलहरे, सिंगापूर, पळू, रामपूर, नांदगाव, आंबेळे(खु!!), पवाळे, भालुक, कोळठण, असोळे, साजई, किशोर, सासणे, तोंडली, कान्होळ, साकुर्ली,    मोहघर, कोळोशी, खोपिवली, चासोळे, साखरे, वडवली, माळ, वैशाखरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तालुक्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असून नुकत्याच पार पडलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणूका या भाजप व शिवसेना यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. युती काळात एकत्र असलेली शिवसेना व भाजप आता एकमेकांच्या विरोधात असून शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादीचे पाठबळ असल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र कदाचित या स्थानीक स्वराज संस्थांच्या निवडणुकामध्ये पहायला मिळणार असून आगामी 2024 च्या निवडणुकी पूर्वीची ही रंगीत तालीम असल्याचे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *