मुरबाड तालुक्यातील खुटार वाडी व वाकळवाडी रस्त्यावर प्रशासन सह लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष

355

विकास गेला कुणीकडे ? असा आदिवासी नागरिकांचा सवाल

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड​ तालुक्यातील खोपिवली ग्रामपंचायत हद्दीतील खुटारवाडी व मुरबाड-माळशेज-नगर राष्ट्रीय महामार्ग ६१ पासुन १२ किमी वर असणाऱ्या वाकळवाडी या आदिवासी गावात जाणाऱ्या​ रस्त्याची अवस्था​ बिकट झाली असून या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष झाल्यानें या आदिवासीं गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने विकास गेला कुणीकडे ? असा सवाल आदिवासी बांधव करत आहे.
खोपिवली ग्रामपंचायत हद्दतील खुटारवाडी गावात देहरी गावातुन जाणारा डांबर निघालेला खडीचा रस्ता जातो. दवाखान्यात, बाजारपेठेत जाण्यासाठी हा एकच पर्यायी रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर नावालाही डांबर न उरल्याने रस्त्यावर खडीच दिसत आहे. यामुळे मोटारसायकलीचे कायम अपघात होताना दिसत आहे. याबाबत प्रशासन व अनेक राजकारणी लोकांकडे स्थानिक आदिवासींनी व्यथा मांडली. परंतु कोणी लक्ष देत नसल्याने देहरी- खुटारवाडी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तसेच खोपीवली ते खुटारवाडी या रस्त्यावरही लाखो रुपये खर्च करुनही या ही रस्त्याची अवस्था बिकट असल्याने आदिवासींनी प्रवास करायचा कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे.
खोपिवली ते खुटारवाडी रस्ता कधी​ होईल? असा सवाल विचारला जात असून हा रस्ता पुर्ण झाला तर लोकांना खुपच सोईस्कर होईल. तसेच​ देहरी- खुटारवाडी या रस्त्यावर जवळपास​ 10 ते 12​ वर्षा पुर्वी​ डांबरीकरण झाले होते. पण आता मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत प्रियंका सुधाकर वाघ, माजी सरपंच खोपिवली-खुटारवाडी यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा केल्याचे सांगितले. तर अशीच परीस्थिती तालुक्यातील वाकळवाडी या रस्त्यांची झालेली दिसत आहे.
 मुरबाड -नगरच्या राष्ट्रीय महामार्गापासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाकळवाडी चार रस्ता गेली दहा ते बारा वर्ष पूर्णपणे दुर्लक्षित राहिल्याचे दिसत आहे. एकीकडे मुरबाड तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा होत असताना आदिवासी दुर्गम भागातील अनेक रस्ते इतकी वर्ष दुर्लक्षीत कसे रहातात असा प्रश्न येथील आदिवासी शासनाला विचारत आहे. आदिवासींच्या विकासासाठी लाखो करोडोचा निधी वापरला जात असतानाही खुटल बारागाव या गावाशी संलग्न असलेल्या वाकळवाडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने आदिवासी बांधव प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत. या रस्त्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन पावसाळा सुरू होण्याआधी डागडुजी करावी अशी मागणी  केली जात आहे.
टोकवडे गावापासून करचोंडे मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर या भागातील आदिवासींना जाण्या-येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे शासनाने रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा आम्हाला सनदशीर मार्गाने न्याय मागावा लागेल असे सांगत विकास गेला कुणी कडे ? अशी विचारणा केली जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *