शिरूरच्या पश्चिम भागात चोरीच्या घटनात वाढ – शेतकरी,नागरिक,व्यावसायिक चिंतेत 

285
          शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांच्याम पार्श्वभूमीवर परिसरातील गावातील शेतकरी,नागरिक,व्यावसायिक चिंतेत पडले असून चोरयांना आळा बसणार कधी ? असा सवाल सर्व सामान्य नागरिकांतून केला जात आहे. जांबूत येथील कृषी सेवा केंद्र,मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याची घटनानुकतीच  घडली आहे आहे.शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या या भागात चोरटयांकडून सातत्याने होत असलेल्या या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिरूर पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याने सर्व सामान्य नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
         शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार चोरी, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न,दुचाकी चोरी या पाठोपाठ आता चोरटयांनी व्यावसायीकांची दुकाने फोडण्यास सुरुवात केली आहेत. जांबुत ता. शिरुर, पंचतळे परीसरातील ७ दुकाने फोडत चोरट्यांनी रोख रक्कम लूटून नेली आहे. यामध्ये समृद्धी मेडीकल, साई गणेश मेडीकल, वृंदावन औषधालय, नोबेल हेल्थ केअर मेडिकल, शिवांश अँग्रो, समृद्धी अँग्रो या दुकानांचे शटर उचकटून चोरी केली आहे.तसेच पिंपरखेड येथील एक कृषी सेवा केंद्रांमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.मागील महिन्यात पिंपरखेड येथे दोन घरफोडी, तसेच शेतीपंपाच्या केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. शेती पंपाच्या केबल चोरीच्या घटना वरचेवर घडत असल्याने शेतकरी,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शिरूर पोलिसांपुढे चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले असून याबाबत पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सर्व सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस शिपाई सुरेश नागलोत यांनी घटनास्थळी पोहचत पाहणी केली असून पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. या भागात मोटार चोरी, दुकान फोडी प्रकरणी शिरूरचे ऊपविभागीय आधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नजीम पठाण, पोलिस नाईक राजेंद्र गोपाळे यांनी घटनास्थळी भेट दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *