चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करावे – शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांचे आवाहन 

265
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील विशेषतः बेट भागात मागील काही दिवसांत चोरीच्या अनेक घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गावातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहान उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी केले आहे.
      सध्या पालखी सोहळा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी गेल्याने मनुष्यबळ कमी पडत असून या कालावधीत चोरीच्या घटना घडत असल्याने गावातील प्रत्येक व्यक्तीने पोलीस म्हणूनच काम करावे गाव आपलेच आहे त्यामुळे जबाबदारी सर्वांची आहे,ग्राम सुरक्षा दलातील जवानांनी गावात गस्त घालून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन देखील गवारी यांनी केले.ते शिरूर तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शेतकरी,ग्रामसुरक्षा दलातील जवान व ग्रामस्थांसमवेत झालेल्या बैठकीत बोलत होते.
       शिरूरच्या बेट भागातील काठापूर,पिंपरखेड,जांबूत, वडनेर,चांडोह या गावामध्ये चोरट्यांकडून शेती पंप, केबल चोरीच्या घटना बरोबर व्यवसायिक दुकाने टार्गेट केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांनीयावेळी उपस्थित नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या केबल चोरीच्या घटनामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने या घटनांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी यावेळी केली.गेले तीन चार महिने पंचतळे येथील चौकात पोलिसांची उभी असलेली बस काढून नेल्यानंतर गुरुवारी पहाटे जांबूत व पिंपरखेड परिसरात चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचे यावेळी ग्राम सुरक्षा दलातील जवानांनी पोलिस अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.तर पोलीस बस व एक कर्मचारी रात्रीच्या वेळी या भागात गस्त घालण्यासाठी देऊ त्याच्याबरोबर तीन चार ग्रामसुरक्षा दलातील जवानांनी गस्त घालण्यासाठी सहकार्य करावे या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आवाहनाला ग्रामसुरक्षा दलाने सहमती दर्शवली.घरफोडी, मोटर केबल चोरी, घटनाबाबत काही गोपनीय माहिती असेल तर त्या नागरिकांनी पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी  ग्रामस्थांना केले.शिरूर पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून पिंपरखेड येथे पहिलीच भेट असल्याने यावेळी यशवंत गवारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नझीम पठाण,पोलिस अमंलदार राजेंद्र गोपाळे, उपसरपंच विकास वरे,वडनेरचे सरपंच विक्रम निचित, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे,बळवंत बोंबे, ग्रामसुरक्षा दलातील जवान व ग्रामस्थ उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *