BREAKING NEWS
Search

ग्रामपंचायत विभाजन प्रक्रियेत कायद्याने प्रतिबंधित “हरिजन” शब्द आरपीआय सेक्यूलर च्या मागणी नंतर परिशिष्टातून वगळले

366
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : तालुक्यातील कळंभाड (भो.) येथील ग्रामपंचायत विभाजन प्रक्रियेच्या एका पत्रकामध्ये चक्क कायद्याने प्रतिबंधित केलेला “हरिजन” शब्द वापरला असून, याबाबत आरपीआय सेक्युलरने आक्रमक भूमिका घेत पत्रव्यवहार केल्याने सदर परिशिष्टातून” हरीजन” शब्द वगळण्यात आला आहे. मुरबाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे अशा वस्त्यांचे अन्य नामकरण करावे, असा शासननिर्णय असतानाही मुरबाड तहसीलदार यांनी प्रभाग रचनेत अनेक गावांमध्ये हरिजन वस्ती असा उल्लेख केला. मुळात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत हरिजन अशी कुठलीही जात नसताना तहसिलदार यांनी असा असंविधानिक शब्द वापरणे हे गैर असून, यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याचे आज आरपीआय सेक्युलरद्वारा आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सांगितले. सदर गंभीर बाब मुरबाड तहसीलदार, कल्याण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्रव्यवहार करून  कळवली. त्यानुसार याबाबत दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली असून, सदरचे परिपत्रक दुरुस्ती करून हरिजन शब्द वगळून नव्याने जारी केले आहेत. मात्र अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक अशी कृत्ये करीत असतील तर त्यांच्यावर आरपीआय सेक्युलर कायदेशीर कारवाई केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा रविंद्र चंदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. याप्रसंगी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धनगर, युवा अध्यक्ष राजेश गायकवाड, निखिल अहिरे, किशोर गायकवाड, अविनाश रातांबे, सचिन धनगर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *