पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २५ लाख डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड – शासनाला ४५ कोटी रुपयांचा महसूल जमा – रामदास जगताप 

360
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  राज्य शासनाच्या महसूल विभागाने  सुमारे आडीच वर्षापूर्वी सुरु केलेल्या महाभूमी पोर्टल वरून आतापर्यंत सर्वाधिक २५ लाख डिजीटल स्वाक्षरित सातबारा व ६.३८ लाख खाते उतारे एकट्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी डाऊनलोड केले आहेत संपूर्ण राज्यात २.२१ कोटी डिजीटल ७/१२ , ६१.४२ लक्ष डिजीटल खाते उतारे आणि ४.८७ लक्ष डिजीटल स्वाक्षरीत फेरफार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतिने डाउनलोड करून घेतले आहेत त्यातुन प्रति अभिलेख १५ रूपये प्रमाणे राज्य शासनला सुमारे ४५ कोटी रूपयांचा महसुल नक्कल फि स्वरूपात प्राप्त झाला असल्याची माहिती राज्याच्या ई फेरफार प्रकल्पाचे माजी समन्वयक तथा पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सा.समाजशील बरोबर बोलताना दिली.
तर महाभूमि पोर्टल चा सामान्य नागरिक,शेतकऱ्यांना होत असलेला फायदा पाहून खरे समाधान मिळत असल्याचे ही जगताप यांनी सांगितले. सही सह डिजिटल उतारे शेतकऱयांना मिळत असल्याने व या खाते उताऱ्यांचा बँक,शासकीय कार्यालयात उपयोग होत असल्याने आता  तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायचे काम थांबले असून अजून ही काही उतारे,फेरफार डिजिटल स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याने ते  तात्काळ डिजिटल स्वरूपात मिळण्याकामी सरकारच्या संबंधित विभागाने तात्काळ उपाय योजना करण्याची गरज शेतकरी विलासराव रोहिले,रामदास कांदळकर,रामदास पवार,बाळशिराम रोहिले व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *