मुरबाड,ठाणे : मुरबाड-शहापुर जोडणारा काळु नदीवरील धोकादायक पुल रस्ते विकास महामंडळाकडुन जमिनदोस्त, पर्यायी रस्ता अवघड असल्याने वाहतुक ठप्प,प्रवाशांचे हाल

491
         मुरबाड,ठाणे : मुरबाड -शहापुर तालुक्याला जोडणारा काळु नदीवरील धोकादायक पुल काल रस्तेविकास महामंडळाकडुन जमिनदोस्त करण्यात आला. यावेळी मोठी गोपनयता पाळण्यात आली होती.
          सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटने नंतर सर्वत्र पुलाच्या पहाण्या करण्यात आल्या त्या पहाणीत काळु नदीवरील पुल धोकादायक ठरविण्यात आला होता. त्या नंतर या पुलावरुन अवैध प्रवासी वाहतुक जीव धोक्यात घालुन सुरु होती. मात्र या मार्गावर सरकारी बस सेवा बंद असल्याने 28 कि मी अंतर प्रवाश्याना 45 किमी प्रवास करुन फेरा मारुन करावा लागत होता. फेरा वाचावा म्हणुन खासदार कपिल पाटील याना मिनी बस साठी प्रयत्न करा अशी मागणी होत होती. मात्र तीन वर्षाच्या प्रतिक्षे नंतर या रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडुन सुरु करण्यात आले असुन काल या पुलाला सुरुंग लावुन जमिनदोस्त करण्यात आले. या जमिनदोस्त प्रक्रियेचा व्हिडीवो  व्हायरल झाल्यावर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या मार्गा वर बनवलेला पर्यायी रस्ता अतिशय चढावाचा व धोकादायक असल्याने वाहतुक पुर्ण पणे ठप्प झाली आहे. तर पुलाचे काम लवकर सुरु व्हावे अशी मागणी आता होत आहे. मात्र या पुलासाठी शहापुर चे आमदार पांडुरग बरोरा व मुरबाड चे आमदार किसन कथोरे हे आग्रही होते. मात्र हा पुल लवकर व्हावा व प्रवासाची गैरसोय दुर व्हावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *