वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यु

735

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड अतिरिक्त कुडवली एम.आय.डी सी. क्षेत्रातील विज मंडळाच्या टायगर स्टील कंपनीच्या फिडर वरील लाईनवर काम करत असताना बाबु पवार या कर्मचाऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वीज मंडळांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र या घटनेची माहिती देण्यासाठी वीज मंडळाचा एक ही अधिकारी देण्यासाठी कार्यरत नसल्याचे दिसून आले. मात्र घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, कुडवली गावाजवळील  घुट्याची वाडी येथील विज पुरवठा गेल्या तीन ते चार दिवसा पासुन बंद होता. हा खंडीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बाबु पवार हा विजकर्मचारी हाय व्होल्टेज असलेल्या डी.पी.  ट्रान्सफॉर्मर लावलेल्या पोलवर चढून एल टी लाईनवर काम करत असताना त्याच पोल वरून गेलेल्या हाय व्होल्टेज तारेचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळें अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या कर्मचाऱ्यासोबत कुणीच दुसरा कर्मचारी नव्हता का? एकाच पोल वर उच्च दाबाचा व कमी दाबाचा विज पुरवठा होत असताना विज पुरवठा बंद केला होता का? त्याच्याकडे सुरक्षेची साधने का नव्हती ? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मात्र अपुरी कर्मचारी संख्या, अपुरी सुरक्षेची साधने यामुळे यापूर्वीही अनेक वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्याच्या घटना पहायला मिळाल्या आहेत. नेहमी प्रमाणे अधिकारी वर्गही अश्या घटना घडल्या की मौन बाळगून असल्याने मृत्यूचे ठोस कारण कधीच पुढे येत नाही. मात्र काल झालेल्या या दुर्घटनेत मरण पावलेल्या बाबु पवार यांच्या पवाळे गावात शोककळा पसरली आहे. तर कर्मचारी वर्गात ही दुःखाचे सावट पसरले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *