शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे बैठक संपन्न

219

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयात पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत असगावकर यांच्या  मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त कार्यालयाच्या वतीने शिक्षण उपायुक्त शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ, अधीक्षक कृष्णा डहाळे व इतर आधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशन) चे समन्वयकदादासाहेब गवारे यांनी अनेक प्रश्न स्थित केले व तातडीने प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. मा.आमदार प्रशासकीय कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषता पुणे जिल्हा भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक बाबत (पे.युनिट) त्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यासंबंधी कडक उपाययोजना करण्याची सुचना वरिष्ठांना केली. प्रशासनाने दखल घेऊन ठोस पाउले उचलण्याचे मान्य केले. सदर सभेमध्ये पुढील विषयावर चर्चा झाली. थकीत पगार बिले, फरक बिले, 1 तारखेला पगार करणे,  पी.एफ. स्लीपा व पी. एफ. प्रकरणे, मेडिकल बीले, सेवानिवृत्तांची विविध थकीत बीले, शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व सेवकांची नावे समाविष्ट करणे अनुकंपाखालील पदे ताबडतोब भरणे व मान्यता देणे शिक्षक व सेवकांची पदोन्नती शिक्षक, सेवकांची रिक पदे त्वरित भरणे, वैयक्तिक मान्यता देणे, आदी विषयांवर सविस्तर चर्चा होऊन तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *