स्वातंत्र्य दिनी मुरबाड तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न ; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा

334
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्ताने तालुक्यात विविध उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा ही मोहीम राबवून मोठया उत्सहात देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तालुक्यातील जि.प.शाळा खेडले तलवली येथे विद्यार्थांकडुन घोषणाबाजी देत संपुर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती. तसेच शाळेत विद्यार्थांनी अनेक राष्ट्रीय महापुरुषांबद्दल आपल्या भाषणातुन विचार मांडले तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील माजी वायु सैनिक के.डी.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. देशाच्या वायु सेना दलात 28 डिसेंबर 1968 ते 31 डिसेंबर 1983 अशी सेवा बजावताना भारत पाक युध्दात 1971 साली पश्चिम कमान भारतीय वायु सेनामध्ये सलग 13 दिवस ते सक्रीय होते. देशासाठी अतिशय मोलाची कामगिरी करण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार या भारत मातेच्या पुत्राचा ग्रामपंचायतीने व नागरिकांनी आनंदाने सत्कार केला, तर दुसरा सत्कार वारकरी संप्रादायात काम करणारे दत्तात्रय दळवी (गुरुजी) यांचा करण्यात आला. मुरबाड तालुक्यातील तळेगांव जि.प.शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सिमाताई घरत व अनिल घरत यांनी कच्छ युवक संघ कल्याण शाखा यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले. 113 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले देशाप्रति असणारे कर्तव्य पार पाडले. मुरबाड तहसीलदार कार्यालयात 75 विद्यार्थ्यांनी एकाच वेळीं भाषण सादर करत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.  तालुक्यांत विविध ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करून सदृढ भारत अभियान राबविण्याचा प्रयत्न केला. यामुळें तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करून अमृत महोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *