पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

356
        शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील आमदाबादच्या पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
         वीर पत्नी अनिता नर्हे, एकल महिला लक्ष्मी पवार, शकुंतला ढोबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारत माता, लोकमान्य टिळक, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा परिधान करून त्यांची भूमिका साकारली.या कार्यक्रमानिमित्त आमदाबाद गावचे माजी आदर्श सरपंच प्रकाश थोरात, विद्यमान सरपंच सविता ताई माशेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे पाटील, प्रदिप साळवे, उपसरपंच कांताराम नर्हे, सदस्या लिलाबाई पवार, माजी उपसरपंच भागचंद पवार, माजी सरपंच पोपट घुले, योगेश थोरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिता ताई घुले,अविनाश सोनार, उद्योजक आबा पवार,चेअरमन अशोक माशेरे, मोहन तात्या थोरात, माजी पोलीस पाटील शिवाजी थोरात, विद्यमान पोलिस पाटील दिलीप साळवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन पवार माजी सैनिक भिवाजी थोरात, ग्रामसेवक हंगे, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक वृंद , तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते . मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पोटे सरांनी सुत्रसंचलन तर पोंदे सरांनी आभार व्यक्त केले. शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांचा सार्वांगिण विकासासाठी दर शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ समवेत श्रमदानाची संकल्पना पुढे आली. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना डॉ अंकुश नरवडे, लिलाबाई पवार, आणि भागचंद पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आले.  अमृत महोत्सव निमित्ताने शाळा पातळीवर घेण्यात आलेली पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी पोवाडा, भाषणे, देशभक्तीपर गीते यावेळी सादर केली. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आणि खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *