वडिलांनीच मुलीला नदीच्या वाहत्या पाण्यात दिले ढकलून

534

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील बजरंगवस्ती राहणारी मुलगी अपेक्षा युवराज सोळुंखे (वय वर्षे ७) ही मंगळवारी बेपत्ता झाली होती. बेपत्ता  झाल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली होती. राञभर मुलीचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिसांनी देखील अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. आजुबाजुच्या ठिकाणी सी सी सी फुटेज चेक केले असता मुलीचे वडिल तिला नदीच्या दिशेने घेऊन जाताना दिसले. शिक्रापूर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केल्यानंतर त्याने मुलीला पाण्यात ढकलून दिल्याची कबुली दिली. नंतर शिक्रापूर पोलिस वेळ नदीशेजारी गेले असता मुलीच्या चपला आढाळल्या. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेंमत शेडगे करत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *