वळसे पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान संपन्न

673

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे स्वतंत्र भारतासाठी चे योगदान अनन्यसाधारण आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण दिली. रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. सन १९४४ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. तर जय जवान जय किसान ही घोषणा देऊन शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तर सैनिक देशाचा रक्षक आहे. हे लालबहादूर शास्त्री यांनी सांगितले. असे प्रतिपादन प्राचार्य शत्रुघ्न थोरात यांनी केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्रा. बापूसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवले. तसेच महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यातून विद्यार्थी स्वयंसेवक यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अभियानात १०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि या विभागातील प्राध्यापक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला भीमाशंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, खजिनदार प्रदीप वळसे, सेक्रेटरी चंद्रकांत ढगे, ओ. एस. डी चव्हाण सर आणि प्राचार्य शत्रुघ्न थोरात यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.बापूसाहेब शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. जमीर इनामदार यांनी केले. या कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा.फदाले, प्रा.सुक्रे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा संजीवनी टाके यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *