मुरबाड तालुक्यातील 35 ग्रामपंचायत निवडणूकीत 10 ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच बिनविरोध तर तीन ठिकाणीं उमेदवारी अर्जच नाहीत

380

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 35 ग्रामपंचायत च्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी दहिगाव चाफे, इंदे, किसळ, नांदगाव, पवाळे, साखरे, शेलगाव, उमरोली बु!!, वेळुक, खेवारे, या दहा ग्रामपंचायत मध्ये एकच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या ठिकाणीं थेट सरपंच निवड झाल्याची फक्तं घोषणा करणे बाकी राहिले आहे.  तर उमरोली खुर्द, वडवली, व आंबेळे खु!!, या तीन ठिकाणीं आरक्षित उमेदवार नसल्यानें एक ही अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त च रहाणार आहे. तालुक्यांतील उर्वरित 22 ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी लढती होणार असुन याठिकाणी बिनविरोध निवड करण्यात राजकीय अपयश आल्याचे बोलले जात आहे. मात्र बिनविरोध सदस्य व थेट बिनविरोध सरपंच निवड होत असल्याने राजकीय पदाधिकारी त्यांच्या सोयीचे उमेदवार पदावर बसवत असून सामान्य मतदारांना विश्वासात न घेता आपला मतदानाचा हक्क हिरावत असल्याच्या प्रतिक्रिया मतदार वर्गातून येत आहेत. गावातली सामाजिक, राजकीय वातावरण बिघडू नये यासाठी बिनविरोध चा पर्याय निवडला जातो. मात्र मतदानाचा हक्कापासुन वंचीत ठेवत असल्याच्या प्रतिक्रीया मतदार देत आहे. मात्र तालुक्यांतील या 10 थेट सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचें सर्वत्र अभिनंदन होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *