शिरूर येथील विठ्ठल नगर येथे “सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा” कार्यक्रमाचे आयोजन

268

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. यामध्ये हरिपाठ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिकिर्तन, आदि सांप्रदायिक कार्यक्रम संपन्न होत असतात. शिरूर येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज समाजसेवा प्रतिष्ठाण यांच्या वतीने दि. ०४ रोजी वर्धापन दिन व कार्तिकी एकादशी सोहळ्याचे अवचित्त साधत “सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक, महाआरती, संगीत भजन, प्रसाद तसेच प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रा.अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन संपन्न होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण समाजशील न्यूज या यूट्यूब चॅनेल वर दाखवण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण बनकर यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *