पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कलाकारांसाठी दिवाळी फराळाचे वाटप

188

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी कलाकारांचा सन्मान करून त्यांना दीपावली निमित्त मिठाईचे वाटप संघटनेच्या वतीने करण्यात आले. संघटनेच्या वतीने सर्व सेवानिवृत्त बांधवांना दिवाळी धमाका या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी संघटनेचे सभासद संभाजी राजे तळेकर यांनी स्त्री चे वर्णन अप्रतिम शब्दात करून, चल रे वाघ्या रडू नको, पाया कोणाच्या पडू नको हे गाणं म्हणून सर्वश्रोत्यांची मने जिंकली. संघटनेचे अध्यक्ष संपत जाधव तसेच सचिव सुरेश शेळके साहेब व कारागृह विभागाचे अध्यक्ष गुंजाळ साहेब तसेच इनामदार साहेब,  भोसले साहेब, प्रकाश दौंडकर साहेब, कैलास ढेरे, धुमाळ सो, तेलधुने साहेब यांचे सह सर्व सभासदांनी सामाजिक बांधिलकी जपत संघटनेच्यावतीने निर्माती प्रमुख सुजाता भाटे व इतर सिनेअभिनेत्री शितल, नवतारका वैष्णवी, बैलगाडा फेम कुकु, नर्गीस या कलावंतासह सर्व कलाकारांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करून संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांनी कलाकारांना व उपस्थिती सर्व श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी दिनेश कुर्हाडे यांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सभासद बहुसंख्येने हजर होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *