शासनाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ढोलकीचा बादशहा हरपला – गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे निधन 

856
शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक,ज्येष्ठ ढोलकी पटू,लोकगीतकार,लेखक व कवी म्हणून नावाजलेले ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे यांचे आज दि. ०३ ला पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते.महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने गंगारामबुवांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनाने समस्त रेणके परिवारावर दुःख;चा डोंगर कोसळला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनी) रेणके यांचे ते आजोबा होत.
      त्यांच्या निधनाबद्दल माजी गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील,शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील,शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,बेल्हा लोकनाट्य राज्यस्तरीय तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप,आझाद बोरगावकर,सरपंच सुनीता पोकळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा,वैशाली रत्नपारखी,मधुकर रोकडे व अनेक ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *