सविंदणेत लंपी आजाराने बैलाचा तडफडून मृत्यू- शेतकऱ्याचे सुमारे दहा लाख रूपयांचे नुकसान

712

सविंदणे, शिरूर (प्रतिनिधी, अमिन मुलाणी) : शिरूर तालुक्यातील सविंदणेच्या लंघे मळ्यात डॉ. भिमराव लंघे यांचा सहा वर्षे वयाचा असलेला पण बैलगाडा क्षेत्रात अधिकाधिक मान मिळवून देणाऱ्या शर्यतीच्या बैलाचा शनिवार दि. ५ ला रात्री ९:३० वा. दरम्यान लंपी आजाराने गोठ्यातच तडफडून मृत्यू झाला. सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डॉ. भिमराव लंघे यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.
घटनेची माहिती स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय मुने यांना देताच ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले. मृत्यू झालेल्या बैलाची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला.
मागील काही महिन्यात त्याची स्वतंत्र गोठा, वेळोवेळी योग्य ते लसीकरण, औषधोपचार, वेळेवर खानपान करण्याची व्यवस्था ठेवण्यात आल्याची लंघे यांनी सांगितले. नुकतीच बैलाला दहा लाख रुपयांना मागणी झाली होती. पण हा बैल देवाचा मानकरी असल्याने आणि पशु, प्राण्यांना जीवापाड जपणाऱ्या लंघे कुटुंबियांनी ती नम्रपणे नाकारली.
बैल तडफडून मृत्यूच्या दारात गेल्याचे पाहून लंघे कुटुंबियांवर दुःख, आर्थिक संकट कोसळले. शासनाने याची दखल घेऊन डॉ.भिमराव लंघे कुटुंबियांना अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष लंघे, प्रसिद्ध बैलगाडा मालक महेश डोके, दत्ता मोडके, बाळासाहेब गावडे, आनंदा लंघे, अर्जुन लंघे, केतन शहा, समीर वाळुंज, समीर सिनलकर, विकास पंचरास यांनी केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *