शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील मंगल फडके यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार

225

रामलिंग, ता.शिरूर (-प्रतिनिधी,गणेश बोरगे) : रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मानव विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार तेजस फडके यांच्या मातोश्री मंगल फडके यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मानव विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, रामलिंग महिला उन्नतीच्या अध्यक्षा राणी कर्डीले, मानव विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. रामलिंग येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यकम घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिजाऊ जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करत त्यांचे विचार व्यक्त केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील आणि मानव विकास परिषदेचे संदीप कुटे या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणुन शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, गोपनीय पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलिस अंमलदार शंकर चव्हाण, महिला समुपदेशक योगिता गुंड, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, नगरसेविका मनीषा कालेवार, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र खांडरे, मानव विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, कायदे सल्लागार मीना गवारे, महीला जिल्हा मार्गदर्शक शशिकला काळे, ह.भ.प. रामदास महाराज फडके, डॉ.वैशाली साखरे, पत्रकार किरण पिंगळे, वैशाली बांगर, विभावरी देव, सुवर्णा सोनवणे, दिपाली आंबरे, श्रुतिका झांबरे, शीतल शर्मा, सीमा कारकुड, नंदा गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी शिर्के तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षिका मांजरे यांनी तर आभार रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *