प्रमोद क्षीरसागर शिक्रापूरचे नवे पोलीस निरीक्षक 

186
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर पोलिस स्टेशचे नवीन पोलिस निरिक्षक म्हणून प्रमोद क्षीरसागर यांनी नुकताच पदभार स्विकारला. हेमंत शेडगे यांची यवत (ता.दौंड) येथे बदली करण्यात आली. क्षीरसागर यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी मध्ये बदल्या होणार असल्याचे बोलले जात असताना नुकतेच,  जिल्हाअंतर्गत पोलिस खात्याचा कारभार सुरळीत होण्यासाठी पुणे ग्रामीण अधिक्षक अंकित गोयल यांनी पोलीस स्टेशनचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या १० पोलीस निरीक्षकांचा तर ५ सहाय्य्क पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार आळेफाटा येथे कार्यरत असणारे प्रमोद क्षीरसागर यांनी नुकताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचा चार्च स्विकरला. पोलिस निरिक्षक क्षीरसागर यांचा शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्यासह शिक्रापूर मधील अनेक सेवाभावी संस्थांनी सत्कार केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *