शिरूर तालुक्यातील बेट भागातून दुचाकी चोरीला

392

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : शिरूर तालुक्यातील बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरू असून, नुकतीच पिंपरखेड येथे जबरी चोरी झाली आहे. तर कवठे येमाईच्या काळुबाई नगर येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. दि.२१ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मौजे काळुबाई नगर, कवठे येमाई गावाच्या हद्दीत फिर्यादी मनोहर वसंत नरवडे यांचे राहत्या घरासमोर पार्क केलेली मोटार सायकल कोणीतरी ‘अज्ञात चोरट्याने स्वतःचे फायदयाकरीता मुद्दाम लबाडीच्या इरादयाने चोरून नेली आहे. म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध मनोहर नरवडे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत.

वाहन मालकांनी आपल्या टु व्हिलर, फोर व्हिलर गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात. शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आपल्या गाड्या पार्क कराव्या. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.  -सुनिल उगले, पोलीस उपनिरीक्षक, शिरूर




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *