गावा शेजारी होणाऱ्या लॉजिंग बोर्डिंग विरोधात गावकरी आक्रमक ; बांधकाम पडण्याची मागणी

181
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : संपूर्ण ठाणें जिल्ह्यात तंटामुक्त, व्यसनमुक्त असणाऱ्या देवपे या आदर्श गावात कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत ची परवानगी न घेता गावाशेजारी लाॅजिगं बोर्डिंग चे बांधकाम सूरु असल्याने आपले आदर्श गाव अवैध धंद्यामुळे बदनाम होईल, तरुणवर्ग व्यसनाधीन होईल या भीतीने मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती, श्रीकांत धुमाळ, सरपंच, योगेश जमदरे, उपसरपंच प्रगती सांबरे, ग्रामसेवक,संदिप केवणे, यांच्यासह शेकडो संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार संदिप आवारी यांचे कडे धाव घेत सदरचे बांधकाम तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे. बांधकाम न हटविल्यास तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी ठाणें यांनी मुरबाड कल्याण महामार्गावरील देवगाव येथिल अनधिकृत बांधकामांवर नुकताच हातोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच, मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले देवपे या तंटामुक्त, व्यसनमुक्त गावात अवैध रित्या लॉजिंग बोर्डिंग चे बांधकाम सूरु केले असल्याचे निदर्शनास आल्याने ही बाब उघड झाली. या गावात वेळोवेळी समाज प्रबोधन तसेच धार्मिक कार्यक्रम व तरुणांसाठी प्रेरणादायी व कौशल्य विकासात्मक उपक्रम आयोजित केले जातात. अशा आदर्श गावातील परिसरात अवैध धंदे चालणारे केंद्र सूरु होण्यापूर्वीच रोखण्यासाठी ग्रामस्थ विरोध करत आहेत. मुरबाड -बदलापुर या मुख्य रोडवर असलेल्या एन टी,की एफ या इंजिनिअरिंग कॉलेज लगतच कल्याण परिसरातील एकाने गावातील एका गरजु शेतकऱ्याची जमिन घेउन  काॅलेज शेजारी लाॅजिंग बोर्डिंग सुरू करण्याचा घाट घातला आहे. तरी त्यांचे बांधकामासाठी तसेच अकृषिक परवानगीसाठी ग्रामपंचायतने तसेच ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न देता त्याठिकाणी लाॅजिंग बोर्डिंग चे काम प्रगतीपथावर आहे हे बांधकाम महसुल विभागाने तात्काळ न हटविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. काॅलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी स्थानिक, परप्रांतातून आलेले तरुण तरुणी यांमुळे व्यसनाचे आहारी जातील व गावचे पावित्र्य नष्ट होईल ही भीती व्यक्त केली जात आहे. या भीती पोटी सर्व गावकरी व परिसर एकवटला असुन, त्यांनी तहसीलदार कार्यालयात धाव घेऊन आपल्या गावचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी साकडे घातले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागणीवर महसुली विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *