शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राहुल शिवाजी कुल याची निवड

151

निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निर्वी गावचे युवा नेतृत्व राहुल शिवाजी कुल याची नुकतीच निवड झाली असून निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर -हवेलीचे आमदार अशोक बापू पवार तसेच शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर राजे निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल राहुल कुल यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. राहुल कुल हे गेले काही वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या युवकांच्या साथीने कार्य करत आहे. विशेष करून त्यांनी पुणे ते मुंबई या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकऱ्यांना लाईटचे संदर्भात येणाऱ्या अडचणी असो किंवा नुकसान भरपाईचे पंचनामे असू किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या संकटाला सतत ते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे प्रामाणिकपणे उभे राहतात. गावातील विकास कामासाठी हेरगिरीने भाग घेतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युवक पदाची त्यांना जबाबदारी सोपवली आहे. याप्रसंगी घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक निमोणेचे सरपंच संजय आबा काळे, शिरूर तालुका मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिलदादा वाबळे, माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, माजी उपसरपंच शिवाजीराजे सोनवणे, मानसिंग पवार, नितीन सोनवणे, भानुदास सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, उल्हास सोनवणे, अमोल थोरात, अशोक सोनवणे संतोष सोनवणे, शफिक पठाण, रामदास सोनवणे, राहुल वाबळे, प्रवीण सोनवणे, नाना सोनवणे, डॉक्टर संतोष जाधव, विजू पोटे, दत्ता जाधव, दिलीप काळे, पप्पू पाटील, बापू सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल राहुल शिवाजी कुल म्हणाले की, ” शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांच्यासह वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी प्रयत्न करू वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली शिरूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची फळी मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केली जातील अशी ग्वाही देतो. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करायला आपले प्राधान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटन वाढीस प्रोत्साहन देणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *