शिरूर मधील रेशन दुकानदार व केरासीन परवानाधारक ३ दिवसांच्या संपात होणार सहभागी  – धान्य वितरण बंद आंदोलन – शिरूर तहसीलदारांना निवेदन सादर 

523
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार व केरासीन परवानाधारक महासंघाच्या वतीने देशव्यापी व राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून यात शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदार व केरासीन परवानाधारक ३ दिवसांच्या आंदोलनात सहभागी होत संपावर जाणार आहेत. याबाबतचे चे निवेदन आज शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांना देण्यात आले.
 राज्यातील सर्व परवानाधारक दि. ७, ८ व ९ फेब्रुवारी २०२३ रोजी धान्य वितरण बंद आंदोलन करून संपामध्ये सहभाग नोंदवत आहोत. दि. २२ मार्च २०२३ रोजी नवी दिल्ली येथिल रामलिला मैदानापासून ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असुन शिरूर तालुक्यातुन सर्व दुकानदार दि.२० ते २५ मार्च २०२३ पर्यंत मोर्चामध्ये सहभागी होणार असलेने तालुक्यातील सर्व दुकाने एकाचवेळी बंद राहतील. शिरूर तालुका स्वस्त संघटनेच्या वतीने दुकानदारांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे.
         यावेळी संतोष चंद्रकांत सरोदे,गणेश माधवराव रत्नपारखी.कवठे येमाई, शंकर एस.गाजरे जांबुत , लंघे एम. एस सविंदणे, दंडवते आर. बी.मलठण, मुंजाळ व्ही.के.मुंजाळवाडी, दिपक दुडे पाटील,टाकळी हाजी, भरत कालेवार,शिरुर इत्यादी पदाधिकारी व दुकानदार निवेदन देताना उपस्थित होते. 
         ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली ही संघटना केंद्र सरकारकडे रजिस्टर असून संपूर्ण देशातील स्वस्त धान्य दुकाने व केसोसिन परवानाधारक या संघटनेला सलंग्न असून जिल्हा संघटना दुकानदारांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्याबाबत राज्य  जिल्हा संघटनेणे मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच मा. प्रधान सचिन साहेब यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. तसेच वेळोवेळी मिटिंग ही केलेली आहे. परंतु यामध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशन व महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने देशव्यापी व राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिरूर तालुका उपाध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली. दिली. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *