वयाच्या ७० रीत ही तरुणांना लाजवेल असे व्यकतीमत्व – मिठूलाल बाफणा (काका) विधायक कार्यात अग्रेसरच 

489
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे माजी ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गावातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व जवाहरलाल (मिठूलाल) बाफणा  काका यांनी आपला ७० वा वाढदिवस अवास्तव खर्चास फाटा देत गावातील सामाजिक,विधायक व गरजुंना मदतीचा हात देत अत्यंत साधेपणात साजरा केला आहे. मिठूलाल काका आज ७० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असे आरोग्य व शरीरयष्टी सांभाळत त्याच तारुण्य पूर्ण जोशात सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर रहात आहेत.त्यांची ही आरोग्यदायी वाटचाल त्यांचा नियमित शाकाहार,नियमित व्यायाम व शारीरिक हालचाल व सतत आनंदी राहण्याची त्यांची सवय हे असून त्यांनी वयाच्या ७० व्या वाढदिवसी राबविलेला विधायक मदतीचा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी व स्त्युत्य असाच आहे.
     मिठूलाल काकांनी आपल्या ७० व्या वाढदिवशी आपल्या धर्मपत्नी सौ.चंद्रकला बाफणा यांच्या समवेत गावातील थोरामोठ्यांचे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. तर ग्राम दैवत श्री येमाई माता मंदिरात दर्शन घेऊन बालकांना खाऊ वाटप केले.गावातील इतरही गरीब व गरजू कुटुंबाना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या या उपक्रमाचे माजी आमदार पोपटराव गावडे,शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच सौ.सुनीता बबनराव पोकळे,सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,रामदास पवार,सर्व जैन बांधव व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *