आहारातील ग्लुटेन कमी ठेवण्यासाठी ज्वारी, बाजरीचा आहार वाढावा -डॉ.प्रतिमा सातव

164

निर्वी, ता.शिरूर (-प्रतिनिधी, शकील मणियार) : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढुन आहारातील बाजरी व ज्वारीचे महत्व पटवुन देण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे. आहारात ग्लुटेन चा अधिक प्रमाण झाले तर अपायकारक ठरत असुन ग्लुटेन विरहीत ज्वारी व बाजरी खाल्ली तर शरीरीला बाजरी तुन फारबर प्रथिनं कॅल्शिअम जीवनसत्व मॅग्नेशियम इ घटक मुलबक मिळत असुन हिवाळ्यात उष्मांक निर्माण होण्यासाठी बाजरी उपयोगात येतात बाजरीत ओमेगा या घटकासोबतच किडणी व यकृतला फायदेशीर ठरत आहे तसेच ब्लड प्रेशर याकामी मॅग्नेशियम व पोटॅशियम जास्त असल्याने फायदा होत असुन, त्याच तुलनेत ज्वारीत असलेल्या घटकामुळे कॅन्सर सारख्या आजारावर रोखण्यासाठी ॲन्टी ऑक्सीइन्टस ज्वारीत जास्त मिळतात. मधुमेह ह्रदय विकार सारख्या रुग्णांना ज्वारी हिताची ठरत आहे. लठ्ठपणा कमी करणे साठी ही ज्वारी उपयुक्त ठरत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरीचे प्रमाण वाढविणे हिताचे ठरेल असे प्रतिपादन आरोग्य अधिकारी डॉ प्रतिमा सातव यांनी निर्वी येथे केले. तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी विद्यालयातील विद्यार्थी जनजागृती व्हावी या कामी गावात प्रभात फेरी काढुन ब्लड प्रेशरचा आजार भारी बाजरीचा भाकर उत्तम गुणकारी, खाता बाजरीची भाकर नरमेल अंगातील साखर, आहारात येईल ज्वारी कॅन्सर ह्रदय विकारापासुन बचाव करी, ज्वारीची भाकर चवीला भारी, त्वचेचे विकार दुर करी, पौष्टिक तृणधान्याची आहे ख्याती आरोग्य हिच खरी संपत्ती, बाजरीचा होईल आहार तर लोह प्रथिनं मिळतील फार असे श्लोगण वापरून घोषणा देऊन गावकऱ्यांचे लक्ष वेधले. प्रभात फेरी दरम्यान कमलेश बुऱ्हाडे, योगेश सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, दिपक शहाणे, पोपटराव पवार उपस्थित होते. प्रभात फेरीसाठी रामदास गोरडे सर, मुख्याध्यापक विष्णू करपे सर, सुधीर थोरात सर, संगिता दहिफळे मॅडम, कांचन रणे मॅडम, सचिन नलगे सर, डोळससर, जाधव सर, डोंगरे मॅडम, कांबळे मॅडम, भुजबळ सर, नितीन मिसाळ, सेवक वृंद मध्ये शेलार रणसिंग, ठाणेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक जयवंत भगत यांनी योगदान दिले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *