सह्याद्री युवा मंच शिक्रापूर यांच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

189

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सह्याद्री युवा मंच शिक्रापूर यांनी सलग तिसऱ्या वर्षी शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करुन एकूण ३४१ रक्त बॅग संकलन करून ऐक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी इच्छुक महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. अशी अनोखी आगळीवेगळी शिवजयंती साजरी करून समाजापुढे एक दर्श निर्माण केला आहे. यांच्या या कार्याची वेगवेगळ्या स्तरातून प्रशंसा होत आहे. या रक्तदान शिबिरासाठी डॉ.शरद लांडगे- अष्टविनायक हॉस्पिटल, पो. उपनिरीक्षक शिक्रापूर अमोल खटावकर, पो. उपनिरीक्षक शिक्रापूर राजेश माळी , उपकार्यकारी अभियंता महावितरण नितीन महाजन, ॲड.सारिका वाबळे, सहा.अभियंता महावितरण अशोक पाटील , महेश शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांनी सह्याद्री युवा मंचच्या कार्याचे गौरवोद्गार काढले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबीराचे नियोजन सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष शशिकांत कानडे व पदाधिकारी जयदिप शिंदे, तुषार असवले, अभिजीत यादव, रोहन गायकवाड, धनाजी हरणे, कृष्णत शेवाळे, अरुण देसाई, अमोल झणझणे, सागर भोसले, सचिन शिंदे, चंद्रगुप्त मोरे, आणि सभासद अमित शिंदे, यशवंत गावडे, संभाजी थोरात, अतुल मोरे, प्रविण कणसे यांनी केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *