मुरबाड शहरातली फूटपाथ मोकळा करण्यास नगरपंचायतला अपयश ; नागरिकांच्या मागणीला केराची टोपली

605
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्या लगत पादचाऱ्यांसाठी फूटपाथ बनवून सात वर्ष झाली. मात्र वारंवार नागरिकांनी तक्रारी करून देखील नगरपंचायतला फूटपाथ मोकळे करण्यात अपयश आल्याने आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांच्या मागणीला होकारात्मक उत्तर देत नगरपंचायत प्रशासन कधीतरी थातुर मातुर करवाई करते. मात्र पुन्हा जैसे थे ! मागिल ३ महिन्यापूर्वी आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास देसले यांनी याबाबत आंदोलनं छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावेळेस प्रभारी अधिकारी कामकाज पाहत असल्याने मुख्याधिकारी हजर झाल्यावर यावर करवाई होइल असे पत्र देण्यात आले. मात्र गेलीं दोन महिने मुख्याधिकारी म्हसे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर हि कुठलीच करवाई होत नसल्याने कैलास देसले यांच्या आंदोलनाच्या बंडाला थंड केल्याचा आरोप नागरिक करत आहे. विद्यमान नगराध्यक्ष व तत्कालिन शिवसेना शहर प्रमूख राम दुधाळे यानी हि याबाबत अनेक आंदोलनं केले. मात्र आता नगराध्यक्ष असतानाही फूटपाथ मोकळा करण्यात अपयशी ठरले आहेत. तर मनसे नेही अनेक वेळा यासाठी आंदोलनं केले. मात्र प्रशासनाला पादचारी नागरिकांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. शहरात येणाऱ्या व्यापारी वर्गाची अवजड वाहने, फूटपाथ वर अतिक्रमण, फेरीवाल्यांची दुकाने, अस्थाव्यस्थ पार्कींग यामुळे पायी चालणाऱ्यांनी कसे व कोठून चालावे हा प्रश्र्न कायम प्रलंबित राहिला आहे. याबाबत प्रशासन करवाई करणार का? असा सवाल करत नागरिकांनी आता बिना राजकीय आंदोलनं छेडण्याचा इशारा दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *