मुरबाड आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिकांचा आगारावर धडक मोर्चा, आगार प्रमुखाला हटविण्याचे वरिष्ठांचे आश्वासन  

494
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी :-जयदीप अढाईगे) – मुरबाड आगार प्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे जनतेला होत असलेल्या त्रासा बाबत आज मुरबाडाचे माजी नगराध्यक्ष मोहन आत्माराम सासे   यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीं आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशी वैतागले आहेत तसेच त्यांचे लोकप्रतिनिधी बरोबर वागणे बरोबर नसल्याचे वरिष्ठांकडे स्पष्ट करण्यात आले.
   या बाबतचे निवेदन ठाणे जिल्हा वाहतूक नियंत्रक कबाडे यांना देण्यात आले. तर येथील आगार  प्रमुखाना लवकरच हटविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. या निवेदनात  – कल्याण – मुरबाड रोडवरील किशोर गावा जवळ झालेल्या अपघातात चौधरी या ईसमाचा मृत्यू झाला होता. त्याला मदत तर बाजूलाच राहीली परंतू  माणूस की धर्माने न भेटणे,ग्रामीण भागातील एस टी च्या फेऱ्या अचानक पणे रद्द करणे,मानव विकास योजने अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बस रद्द करून विद्यार्थीनीना आर्थिक भुर्दंड सोसायला लावणे,एसटी कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने वागवणे तर काहींना सवलती देऊन कर्मचाऱ्यांच्यात फूट पाडणे 31 ऑक्टोबर रोजी मुरबाड जवळ झालेल्या गोरखगड एसटी बस अपघाताचे वेळी बेजबाबदार पणे वर्तन करणे, कायद्याने देय असलेली नुकसान भरपाई प्रवाशांना वेळेवर न देणे या सारख्या गंभीर बाबी मुळे तसेच अरेरावी मुळे  नाराजांनी आज धडक मोर्चा काढला. मात्र निर्णय न झाल्याने अखेर ठाणे वरिष्ठ अधिकारी कबाडे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. तसेच जखमींना तातडीने मदत करणार असे आश्वासन त्यांनी दिले. आज या मोर्च्यामुळे  मुरबाड एस टी आगाराला छावणीचे स्वरूप आले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *