श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

222
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल शिक्रापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. स्कूल ते मलठण फाट्यापर्यंत शिवाजी महाराजांची शिवगर्जना व घोषणा करत मोठ्या जल्लोषांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनीषाताई सायकर, संस्थापक सोमनाथ सायकर, विश्वस्त साकोरे सर, संचालक अक्षय गायकवाड सर, संस्थेचे संचालक अजिंक्य गायकवाड सर, सपना सायकर, संचालक महादेव गायकवाड, संचालिका प्रांजल गायकवाड, संचालक नवनाथ वाव्हळ, संचालक निखिल वाव्हळ, नाट्य परिषदेचे सदस्य पत्रकार राजाराम गायकवाड, खंडेराव  तनपुरे, प्रशालेचे प्राचार्य गौरव खुटाळ सर, उपप्राचार्य उज्वला दौंडकर, शिक्षक, विद्यार्थी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी शिक्रापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेल्या मुलांची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिक, लाठी प्रात्यक्षिक तसेच नृत्य सादर करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तसेच शिवचरित्रावर आधारित सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली व पोवाडे सादर केले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व श्री सिद्धीविनायक चॅरिटेबल ट्रस्ट शिक्रापूर यांनी केले .लेझीम प्रात्यक्षिक राणी ढेरंगे मॅडम, लाठी प्रात्यक्षिक विशाल गुजर सर यांनी बसवले आणि नृत्य दिग्दर्शन स्वाती गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निता शिलवंत व मीरा नरवडे यांनी केले, तर सर्वांचे आभार प्रदर्शन स्कूलचे प्राचार्य गौरव खूटाळ सर आणि उपप्राचार्य उज्वला दौंडकर मॅडम यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *