न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयास क्राय मुंबई व इन्फोबीप फाऊंडेशन यांच्या वतीने सायन्स लॅब प्रदान

527
निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : आज 21 व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञान व विज्ञान या विषयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक पासून विज्ञान हा विषय शाळांमध्ये शिकवला जातो. परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने विद्यार्थ्यांना विज्ञानाचे सिद्धांत लक्षात येत नाही व प्रात्यक्षिकही त्यांना करता येत नाही या गोष्टी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मिळावे या अनुषंगाने न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयासाठी क्राय मुंबई व इन्फोबिफ फाऊंडेशन यांच्याकडून वंचित विकास संस्थेने मिनी सायन्स लॅब उपलब्ध करून दिली आहे. या सायन्स लॅब मध्ये जवळपास पाच लाखाचे विज्ञान साहित्य आहे. त्याच बरोबर मुलांना आवाज प्रकाश बल अशा भौतिकशास्त्रांचे प्रायोगिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून मुलांना विज्ञान अभ्यासणे समजणे व शिकणे यासाठी मदत होणार आहे. इयत्ता पाचवी सहावी सातवी चे महत्वपूर्ण घटक या लॅबच्या माध्यमातून शिकवणे शिक्षकांना सोपे होणार आहे. तसेच ऐनवेळी वर्गामध्ये शैक्षणिक साहित्य घेऊन जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांना लॅबमध्ये नेऊन ही सर्व प्रात्यक्षिक शिक्षक सहजतेने दाखवू शकतात. यामुळे शिकणे व शिकवणे सोपे झाले आहे. इन्फोबीपच्या सारिका खरात यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या जगात ग्रामीण भागातील मुलांनी मागे राहू नये व सखोल परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आवश्यक असणारे साहित्य आणि त्यातही विज्ञान विषयाचे साहित्य खूप महत्त्वाचे आहे आणि ही गरज ओळखून शाळेने आम्हाला ही लॅब देण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे धन्यवाद व्यक्त केले.
संस्थेचे कन्सल्टंट राजेंद्र काळे सर यांनी साहित्य देण्यामागचा उद्देश सांगून संस्थेच्या कार्याचा अहवाल व कार्यक्रमाचे प्रस्ताविक आपल्या भाषणातून व्यक्त केले. ही लॅब मिळवण्यासाठी अनिल जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सागरराजे निंबाळकर हे होते. यावेळी श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.हमीद शेख, न्हावरे गावच्या सरपंच अलका ताई बिरा शेंडगे,भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव कांडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब काळे इ. मान्यवर तसेच क्राय मुंबई संस्थेचे प्रकल्प समन्वयक समीर पांडे, आदित्य सर, इन्फोबिप फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी, क्राय शिरूर तालुका प्रकल्प समन्वयक अनिल कांबळे, समुदाय संघटक अनिल जाधव, बिभीषण गायकवाड, जयराम कांबळे, अनिल खरात, सुभाष शिंदे , सेंटर चालीका सीमा जाधव, दिपाली भालेराव, कोमल नेटके, शारदा ढवळे, प्रियांका अवचीते, शुभांगी वळू, पुष्पा जाधव श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचा अध्यापक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *