तुळापूर परिसरात स्वच्छता आभियान संपन्न

215
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : संत निरंकारी मिशन पेरणे फाटा द्वारा अमृत प्रोजेक्ट “स्वच्छ जल स्वच्छ मन” अंतर्गत अखंड महाराष्ट्र चे स्फूर्तिस्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ त्रिवेणी संगम घाट तुळापूर क्षेत्र या ठिकाणी नदी परिसर स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असीम कृपाशिर्वादाने भारत सरकारच्या सहयोगाने संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून संपूर्ण देशात निरंकारी मिशन द्वारा 26 फेब्रुवारी 2023 रोजी अमृत प्रकल्प अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन” या उपक्रमाखाली  27 राज्यांमध्ये , 700+ शहरे 1100+ प्रकल्पाचे ठिकाणी जलाशय पर्यटन स्थळांचे विशाल जल संवर्धन आणि स्वछता अभियान सकाळी 8 ते 12 या वेळेत राबविण्यात आले. ज्यामध्ये समुद्रकिनारी, नदी, तलाव, विहिरी व जलप्रवाह इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. पेरणे फाटा ब्रांच अंतर्गत संत निरंकारी मिशन च्या 220 सत्संग व सेवादल सदस्य यांनी सहभाग घेवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तेथील उपस्थित पर्यटक यांनी देखील या उपक्रमाची प्रशंसा करत स्वतः देखील स्वच्छेते विषयी प्रेरित होऊन स्वच्छतेविषयी जागरूक राहण्याची गवाही दिली. आशा प्रकारे पेरणे फाटा ब्रांच चे प्रमुख संजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोणीकंद प्रबंधक दिलीप रणसिंगे व सेवादल प्रमुख विक्रम पानसरे तसेच तुळापूर ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या उपस्थित अतिशय उत्साही वातावरणात जल स्वछता अभियान कार्यक्रम पार पडला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *