शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी पुणे-नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन

287

राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर) चे रास्तारोको

शिरूर, पुणे (-देवकीनंदन शेटे, संपादक) : कांद्याला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी वीज बील माफ करावे, विज तोड थांबवावे, शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासह शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पार्टी व जनता दल (सेक्युलर) व मित्र पक्षाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर शिरूर जवळ न्हावरेफाटा येथे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचा निषेध करत महामार्गावर कांदे टाकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी न्हावरे फाटा येथे पुणे नगर रस्ता काही काळ आंदोलकांनी आडवून धरला होता, काही काळ वाहतूक खोळंबी होती. दरम्यान शिरूर नायब तहसीलदार महेश काळेगावकर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग अर्थिक संकटात आला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल, कर्ज माफ करणे गरजेचे आहे . या विरोधात कोणतेही प्रस्थापित पक्ष आवाज उठवत नसल्यांची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच  शिरूर तालुक्यात बिबट्याचे प्रमान वाढले असुन गावोगाव बिबटे मनुष्य व पशुधनावर हल्ले करीत आहेत त्यामुळे त्यांना बिबट्या पासुन संरक्षण मिळावे यासाठी वन विभागाने कायम स्वरूपी प्रतिबंधक उपाय योजना करण्याची गरज आहे. बिबट्याच्या भितीमुळे शेतीला दिवसा सुर्योदय ते सुर्यास्ता पर्यन्त वीज मिळावी, कांद्याला हमीभाव द्यावा ,मेंढपाळांना चराऊ कुरणे द्यावेत, राज्यात विविध ठिकानी मेंढपाळावर हल्ले होत असुन त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेधही आंदोलकांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे ,तालुका अध्यक्ष शिवाजी कु-हाडे, जिल्हा संघटक तान्हाजी शिंगाडे,जनता दल  जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिवाजी खेडकर, रासपा नेते रामकृष्ण बिडगर, शिरूर -आबेगाव विधानसभा अध्यक्ष किरण शिंदे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे, शिरूर – आंबेगाव रासपा युवक अध्यक्ष किरण शेडगे ,आप पक्षाचे शिरूर शहर अध्यक्ष अनिल डांगे, अनिल बांडे, नाथाभाऊ पाचर्णे, पंचायत समिती सदस्य आबा सरोदे, जुन्नर रासपा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घोडे,माजी चेअरमन अशोक माशेरे, सरपंच मल्हारी मलगुंडे, दिपक दुडे पाटील, राजेंद्र कटके, युवा अध्यक्ष संदीप देवकाते, शहराध्यक्ष सिंकदर पटेल, उपाध्यक्ष नितीन धरणे, राजेंद्र देवकाते, देविदास पवार, विलास रोहीले, सुरेश उचाळे, अँन्ड रतन बिडगर – पांडोळे, वंदना बोबडे, रुपेश ढवण, नामदेव घुले उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *